शाळेत असताना जास्त करून पॉप साउंडच ऐकायचो. अॅबा, बोनी एम, ब्रायन
अॅडम्स वगैरेंपासून बॉयझोन, बॅकस्ट्रीट बॉयज, स्पाइस गर्ल्स हे
मुलींचे(च) बॅन्ड्सपर्यंत ऐकणे असायचे. नथिंग्स गॉन्ना चेंज माय लव्ह फॉर
यू, कर्मा कमिलिअन वगैरे गाणी भारी वाटण्याचेही दिवस असतात. असेच एकदा
'नथिंग गॉन्ना स्टॉप अस नाउ’ ऐकत मान डोलावत वगैरे असताना मामा तिथे आला.
मी काय ऐकतोय हे पाहून तो म्हणाला, "अरे अजून तू याच स्टेशनावर का?" मी
म्हणालो, "ठिक आहे, तुझे स्टेशन सांग." त्यावर तो उत्तरला, "तू आता जे काय
ऐकतो आहेस त्याला जवळ जाणारे एक गाणे सांगतो. म्हणजे ऐकताना तुला फार शॉक
वगैरे बसणार नाही." त्याने नाव सांगितले 'ब्रिज ओव्हर ट्रबल्ड वॉटर'.
बॅन्डचे नाव 'सायमन अँड गार्फंकेल'. मी हे नाव कधीच ऐकले नव्हते. त्यांची
गाणी ऐकणे तर दूरच राहिले. तेव्हा नेट वगैरे काही नसल्याने पाहिजे ती गाणी
मिळवणे सोपे नव्हते (त्यात मी नूमविचा, मित्रसुद्धा माझ्यासारखेच.) मग काही दिवसांनी तो परत घरी आला असताना त्याने वॉकमनवर ते गाणे ऐकवले
आणि त्याचे म्हणणे खोटे ठरले. मला शॉक बसला. हा साउंडच माझ्यासाठी नवीन
होता. इंग्लिश गाणी अशीही असतात? माझी आणि सायमन-गार्फंकेलशी ओळख अशी
झाली.
लोकसंगीताचा वारसा घेऊन आलेल्या बहुतेक बॅन्ड्समध्ये एक rawness जाणवतो. तो लोकसंगीताचा अंगचा गुण असतो. परंतु हा वारसा घेऊन आलेल्या सायमन-गारफंकेलच्या गाण्यांत मात्र सफ़ाई होती. दिमाख नव्हता, पण चमक होती. असा तोल त्यांनी साधला होता. पॉल सायमन हा आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट गीतकारांपैकी मानला जातो. त्याला गीतकारी जमली होती. त्याला आर्ट गार्फंकेलची मस्त सुरीली साथ मिळाली. 'साउंड ऑफ सायलेन्स' हे फोकरॉकचे राष्ट्रगीत आहे. हे एक protest song आहे. सायमनने हे गाणे केनेडींची हत्या झाल्यानंतरच्या काळात लिहिले. खुद्द सायमनचे म्हणणे - "A societal view of the lack of communication." कुठलेही खरे मानले तरी गाणे अतिमहानच. पण प्रोटेस्ट सॉन्ग घ्यायचे झाले तर मी ’आय ऍम अ रॉक’ निवडेन. ब्रिज ओव्हर ट्रबल्ड वॉटर हे रॉक म्हणता येईल का नाही, यावर वाद होतात, but what the heck! मला आवडते! शेवटी एका गाण्याचा उल्लेख झालाच पाहिजे - 'मिसेस रॉबिन्सन'. द ग्रॅज्युएट (वयाच्या १६-१७व्या वर्षीच पहावा असा चित्रपट ;-) ) या चित्रपटातले प्रचंड गाजलेले गाणे.
ते अजूनही कधीतरी कार्यक्रम करतात. आता त्यांची जुनाट गाणी कोण ऐकत असेल असे वाटते का? २००४ साली रोमच्या कलोसियममध्ये झालेल्या त्यांच्या कार्यक्रमाला ६,००,००० लोक उपस्थित होते.