वॉटसनने जितक्या गोष्टी सांगितल्या, त्याहून जास्त सांगितल्या नाहीयेत.
होम्सच्या कथांमध्ये अशा अनेक प्रकरणांचे केवळ उल्लेख सापडतात. उदा. क्लबफूटवाला रिकोलेटी आणि त्याची घृणास्पद बायको (Ricoletti of the clubfoot and his abominable wife), घरी राहिलेली छत्री
घ्यायला घरात गेलेला आणि गायबच झालेला जेम्स फिलिमोअर याचे प्रकरण,
अॅल्युमिनिअमच्या कुबडीचे प्रकरण (case of aluminium crutch) इ. इ. अनेक प्रकरणांचे नुस्ते उल्लेख
वॉटसने करून ठेवले आहेत आणि नंतरच्या अनेक लेखकांची सोय करून ठेवली.
काही काही प्रकरणांची नावेच इतकी भन्नाट आहेत की मला आठवते, गोष्ट वाचताना
असा उल्लेख आला की गोष्टीचा धागा सोडून 'या प्रकरणात काय झाले
असेल?' हाच विचार थोडा वेळ तरी केला आहे.
माझ्या सर्वात आवडीचे म्हणजे 'राजकारणी, दीपगृह आणि प्रशिक्षित कॉर्मोरंट'
(the case of the politician, the lighthouse and the trained cormorant).
कसले खंग्री आणि उत्सुकता चाळवणारे नाव आहे! याचा उल्लेख वॉटसन 'the case
of veiled lodger' मध्ये करतो. तोसुद्धा महान टेचात करतो - I deprecate,
however, in the strongest way the attempts which have been made lately
to get at and to destroy these papers. The source of these outrages is
known, and if they are repeated I have Mr. Holmes's authority for saying
that the whole story concerning the politician, the lighthouse, and the
trained cormorant will be given to the public. There is at least one
reader who will understand. थेट मासिकातून प्रसिद्ध होणार्या गोष्टीतून
एकाला धमकीवजा सूचना आणि तेसुद्धा बहुतेक करून एका राजकारण्याला! थरारक रहस्य म्हणतात ते हेच असावे.
या गोष्टी 'कॉक्स अँड कंपनी' या बँकेत असलेल्या होम्सच्या सेफ डिपॉझिट बॉक्समध्ये आहेत. त्यातून अजून काय काय बाहेर पडेल? इजाडोरा पर्सानोचे रहस्य कळेल. हा माणूस एका आगपेटीकडे वेड्यासारखा टक लावून का बघत राहिला होता? त्या आगपेटीत शास्त्राला अज्ञात असा एक किडा होता, तो किडा कोणता? मटिल्डा ब्रिग्स हे बाईचे नाव नाही, तर जहाजाचे नाव आहे. त्याचा संबंध सुमात्राच्या प्रचंड उंदरांशी आहे एवढेच आम्हाला माहिती आहे. होम्स म्हणतो, ती गोष्ट ऐकण्यासाठी जग अजून तयार नाही. लाल रंगाच्या जळवेने नक्की काय केले? हे आणि इतर अनेक रहस्ये त्या बॉक्समध्ये आहेत.
त्या बॉक्समध्ये फक्त ही रहस्येच नाहीत. वॉटसनने जाता जाता उल्लेख केल्यामध्ये होम्सच्या अनेक 'मोनोग्राफ्स'चासुद्धा (अभ्यासपूर्वक लिहिलेला लेख) समावेश आहे. होम्सला अनेक विषयांमध्ये गती होती. त्याचे एक कारण म्हणजे त्याची स्वतःची आवड आणि दुसरे कारण म्हणजे व्यावसायिक आवश्यकता. त्यामुळे त्याने अत्यंत चित्रविचित्र विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहिले. पण ते कधी वाचनात आलेले नाहीयेत. यात त्याचे सर्वात महत्त्वाचे लेखन आहे - ’द होल आर्ट ऑफ डिटेक्शन’, अर्थातच शोधण्याची, अनुमान बांधण्याची संपूर्ण कला! हे लेखन अजूनही पूर्ण झाले नाहीये असे मानण्यास वाव आहे. त्याची कच्ची प्रत नक्कीच त्या बॉक्समध्ये असणार. शिवाय पुढील काही तांत्रिक लेखन -
या लेखनाबद्दल आम्ही फक्त ऐकून असतो, पण वाचायला कधी मिळाले नाहीत. त्यांची एक तरी प्रत कॉक्स अँड कम्पनीच्या बॉक्समध्ये असेलच की. केवळ तो बॉक्स मिळवण्यासाठी या कॉक्स अँड कंपनीवर दरोडा टाकावा असे तीव्रतेने वाटते. कोण येतंय?

- Upon the distinction between the ashes of the various tobaccos - यावर होम्सशिवाय अधिक अधिकाराने कोण लिहू शकेल?
- Monograph on polyphonic motets of Lassus - ब्रुस-पार्टिंग्टन प्लॅन्सचे प्रकरण सुरु असताना होम्स हे लिहित होता. ते प्रकाशित झाले पण फक्त खाजगी वितरणसाठी. Polyphonic motets of Lassus हा पाश्चात्य संगीतातला इतका कानाकोपर्यातला विषय आहे की बस्स! पण होम्सने त्यावर अभ्यासपूर्ण लेख लिहिला आणि वॉटसन म्हणतो - तज्ज्ञांच्या मते हा लेख म्हणजे या क्षेत्रातला 'अंतिम शब्द’ आहे.
- शिवाय Anthropological Journal मध्ये कानांवर दोन छोटे लेख.
- गोंदवण्यावर लिहिलेले लेख.
- एक 'जाता जाता' लिहिलेला सांकेतिक भाषेवरचा लेख. आता 'जाता जाता' लिहिला असल्यामुळेच बहुतेक त्यात फक्त १६० वेगवेगळ्या सांकेतिक भाषांचे विश्लेषण केले आहे!
- ’The book of life’, ज्याचा उल्लेख ’साइन ऑफ फोर’मध्ये येतो - somewhat ambitious title of an article written for an English magazine, attempting to show how much an observant man might learn by accurate and systematic examination of all that came in his way. यावरून तरी असे वाटते की ही 'द होल आर्ट ऑफ डिटेक्शन'ची सुरूवात असणार.
- सरतेशेवटी, अर्थातच Practical handbook of bee culture. हे तर पाहिजेच. निवृत्त झाल्यावर मधमाशीपालन सुरू केल्यावर त्यावरही संशोधन करून पुस्तक लिहून टाकले.
लेखांच्या या विस्तृत पसार्यातून होम्सची चिवट, वैज्ञानिक वृत्ती दिसते - दिसला विषय की धर
त्याला आणि घुस खोलात. मग मधुमक्षीपालनासारखा केवळ छंद म्हणून धरलेला विषयसुद्धा होम्सच्या
तावडीतून सुटत नाही.
या लेखनाबद्दल आम्ही फक्त ऐकून असतो, पण वाचायला कधी मिळाले नाहीत. त्यांची एक तरी प्रत कॉक्स अँड कम्पनीच्या बॉक्समध्ये असेलच की. केवळ तो बॉक्स मिळवण्यासाठी या कॉक्स अँड कंपनीवर दरोडा टाकावा असे तीव्रतेने वाटते. कोण येतंय?
No comments:
Post a Comment